शिवसमर्थ देवगड हापूस
थेट बागेतून, विश्वासाने.
सेंद्रिय पद्धतीने, गवताच्या अडीत नैसर्गिकरीत्या पिकवलेला, कार्बाइड विरहित आणि GI टॅग मानांकन प्राप्त देवगड हापूस – आपल्या कुटुंबासाठी खरी चव आणि सुरक्षितता.
आमची कथा
हापूस (अल्फोन्सो) हा भारतातील आंब्यांचा राजा मानला जातो – चमकदार पिवळ्या रंगाची साल, मलईदार, गोड आणि अतिशय सुगंधी फळ. देवगडच्या कातळयुक्त (जांभा दगड) मातीत आणि समुद्राच्या खाऱ्या हवेत वाढलेल्या हापूसला वेगळीच गोडी आणि सुगंध लाभतो.
आमच्या शेवाळे अॅग्रो फार्ममध्ये प्रत्येक झाडाला स्वतंत्रपणे जपून वाढवले जाते. रासायनिक कार्बाइडचा वापर न करता, गवताच्या अडीत नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबेच “शिवसमर्थ देवगड हापूस” या नावाने तुमच्यापर्यंत पोहोचतात.
देवगडची माती आणि हवामान
देवगड हा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनारी तालुका आहे. जांभा दगडी कातळयुक्त जमीन, समुद्राची खारी हवा आणि योग्य प्रमाणात पाऊस – या सर्वांचा संगम हापूससाठी आदर्श परिस्थिती निर्माण करतो.
या अनोख्या भौगोलिक परिस्थितीमुळे देवगड हापूसला GI भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे – जे त्याच्या अस्सलतेची आणि दर्जाची अधिकृत खात्री देते.
कातळ खनिजे
जांभा दगडातील खनिजांमुळे चव, सुगंध आणि पल्प अधिक समृद्ध.
समुद्राची हवा
खारी वाऱ्यामुळे योग्य ताण आणि मोहोर येण्याची नैसर्गिक प्रक्रिया.
GI टॅग
देवगड हापूसला अधिकृत भौगोलिक मानांकन – अस्सलतेची खात्री.
परंपरा
पिढ्यानपिढ्या चालत आलेला अनुभव आणि कलमाची परंपरा.
मान्यवरांच्या भेटी – शिवसमर्थ देवगड हापूस
फार्म गॅलरी
ग्राहकांचे अभिप्राय
“आंब्यांचा रंग, चव आणि ताजेपणा अप्रतिम होता. वेळेवर आणि उत्तम सेवा मिळाली.”
प्रशांत पाटील
“नैसर्गिक गोडसर चव आणि सुगंध यामुळे संपूर्ण कुटुंब आनंदी. दरवर्षी ऑर्डर करणार!”
कावेरी देशमुख
“प्रीमियम क्वालिटी, योग्य वजन आणि पारदर्शक व्यवहार – अस्सल देवगड हापूस अनुभवला.”
मयूर पवार
बुकिंग / संपर्क
हंगामासाठी आगाऊ बुकिंग, कॉर्पोरेट गिफ्ट्स किंवा होम डिलिव्हरीसाठी आमच्याशी थेट संपर्क साधा.
शेवाळे अॅग्रो फार्म
फार्म पत्ता:
गट नंबर ७१/३/२, मु. पो. नाऱिंगे,
ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग 416630
ऑफिस पत्ता:
पुणे-सोलापुर रोड, शेवाळेवाडी फाटा,
मु. मांजरी बुद्रुक, पो. मांजरी फार्म,
ता. हवेली, जि. पुणे 412307
फोन / WhatsApp:
📱 8055865099 (WhatsApp)
📞 9923665522